मुंबई

अभाविपचे महापौरांना निवेदन

CD

अभाविपचे महापौरांना निवेदन
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबईतील शैक्षणिक, सामाजिक आणि सुरक्षेच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), नवी मुंबईतर्फे महापौर सुजाता सूरज पाटील यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात कोपरखैरणे येथील ट्युशन क्लास दुर्घटनेचा संदर्भ देत सर्व क्लासेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर कठोर कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले. पाम बीच रोडवरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण कडक करण्याची मागणीही करण्यात आली.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर बांधकामांमुळे वाढते प्रदूषण आणि फ्लेमिंगो पक्ष्यांच्या घटत्या संख्येबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरातील वाईन शॉप व सिगारेट विक्रीवर बंदीची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचाही मुद्दा मांडण्यात आला.
या वेळी रागिनी चौहान, प्रेम जाधव, शिवेंद्र शिरसाट, विश्वजीत पाटील उपस्थित होते. महापौरांनी मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

चौकट :
अभाविपच्या प्रमुख मागण्या
- ट्युशन क्लासेसचे स्ट्रक्चरल ऑडिट
- अमली पदार्थ विक्रीवर कारवाई
- पाम बीच रोडवर वाहतूक नियंत्रण
- प्रदूषण नियंत्रण उपाययोजना
- फ्लेमिंगो संवर्धन
- शाळांजवळील वाईन शॉप बंद
- विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT