नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करून बेकायदा दगड उत्खनन सुरू असलेल्या ओवेगाव परिसरातील दगड खाणींवर महसूल विभागाने रात्रीच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली. मार्चमध्ये प्रशासनाने सील केलेले क्रशर विनापरवाना पुन्हा सुरू केल्याचे उघड झाले. खारघर पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात सरकारी परवानगीशिवाय उत्खनन करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खारघरमधील ओवेगाव परिसरातील दगड खाणी प्रशासनाने मार्चमध्ये अधिकृतपणे सील केली होती; मात्र संबंधितांनी हे सील बेकायदा तोडून रात्रीच्या वेळी गौण खनिजाचे उत्खनन, प्रक्रिया आणि वाहतूक सुरू ठेवली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राजश्री जोगी, मंडळ अधिकारी आरती रेवस्कर आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. २४) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ओवेगाव येथील सर्व्हे क्र. ३५५ आणि ३५६ मधील खाणींवर अचानक धाड टाकली.
महसूल पथकाची गाडी पाहताच खाणीवरील कामगारांनी वीजपुरवठा खंडित करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला होता. घटनास्थळी दोन हायवा गाड्या दगड भरलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच दगड फोडण्यासाठी तीन पोकलेन मशीनही कार्यरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर मंडळ अधिकारी आरती रेवस्कर यांच्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी सलीम पटेल (अल्ताफ एंटरप्रायझेस), जयश शहा (रेल काल), हरिराम वर्मा (हरिओम एंटरप्रायझेस) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत अंदाजे सात लाखांचे गौण खनिज जप्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.