मुंबई

खारघरमधील आरोग्य केंद्रात अव्यवस्था

CD

खारघरमधील आरोग्य केंद्रात अव्यवस्था
अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी
खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघर परिसरातील एका आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता आणि अव्यवस्थेचा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या केंद्रात स्वच्छतागृहाच्या समोरच औषधांचा साठा ठेवण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होत आहे. स्वच्छतागृहाजवळ औषध ठेवल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खारघर सेक्टर १२ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील आपला दवाखान्यात महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जातात. आरोग्य केंद्र हे स्वच्छ आणि सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे असताना येथे मूलभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्वच्छतागृहाजवळ औषध ठेवल्याचे दिसून येते. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो तसेच औषधांची गुणवत्तादेखील बाधित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
यासंदर्भात खारघरमधील खासगी रुग्णालयातील डॉक्टरशी संपर्क केला असता, स्वच्छतागृहासमोर औषध ठेवू नये. या प्रकारामुळे आरोग्यसेवांबाबत नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो. आम्ही डॉक्टर असल्यामुळे पालिकेच्या विरोधात बोलता येत नसल्याचे सांगितले.
चौकट :
सेक्टर १५ येथील आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी असलेल्या बेडवर वैद्यकीय साहित्य आणि इतर सामान अस्ताव्यस्त ठेवलेले दिसून आले. यामुळे रुग्णांना उपचार घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बेडचा उपयोग औषध-गोळ्या आणि दस्तऐवज ठेवण्यासाठी केला जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, रुग्ण तपासणीसाठी बेड आहेत की साहित्य ठेवण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT