स्थायी समितीचा विकासकामांना हिरवा कंदील
सुरक्षा, रस्ते, आरोग्य व पर्यावरण प्रकल्पांना मोठी मंजुरी
पनवेल, ता. २८ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या विशेष सभेत शहरातील विविध विकासकामे, सुविधा आणि प्रशासनिक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ही सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षात सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत ३० कंत्राटी सुरक्षा रक्षकांना ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच खारघर येथील कोपरा (गणेश) तलावाजवळ पादचारी पूल, संरक्षण भिंत आणि पावसाळी गटार उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
शहरातील नागरिकांच्या आरोग्य व फिटनेससाठी १० ठिकाणी ‘क्रॉप्स फिट’ मल्टी जिम स्टेशन उभारण्यास हिरवा कंदील देण्यात आला. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भाजी मार्केट या मार्गावर मध्यभागी आकर्षक डेकोरेटिव्ह पथदिवे उभारण्याचा प्रस्ताव संमत झाला.
महापालिकेच्या विविध भागांतील विहिरींच्या दुरुस्ती व पुनरुज्जीवनासाठी न्यूनतम निविदेला मान्यता देण्यात आली. खारघर व कामोठे नोडमधील अंतर्गत डांबरी रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण तसेच विविध प्रभागांत प्री-फॅब्रिकेटेड शौचालय उभारणीस मंजुरी देण्यात आली.
भिंगारी-नांदगाव रोड आणि तक्का परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण व गटार बांधकाम प्रस्तावालाही समितीने मान्यता दिली. यासोबतच अग्निशमन विभागासाठी पीपीई किट खरेदी आणि संगणकीय साहित्य पुरवठा यांनाही मंजुरी मिळाली.
नागरी आयुष्यमान आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी पोर्टा केबिन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पिसर्वे व ओवे गाव येथे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण आणि ८,८९० अतिरिक्त वृक्ष लागवडीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
बस थांब्यांची दैनंदिन साफसफाई आणि शहरात आकर्षक विद्युत रोषणाईसाठी वाढीव खर्चालाही मंजुरी देण्यात आली. या सभेला स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी, शहर अभियंता आणि इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
शहराचा सर्वांगीण विकास
या सभेत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांमुळे पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. रस्ते, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि मल्टी-जिम प्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरण संतुलनावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.