सिडकोतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर
व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य आणि एआय तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : सिडकोतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना कार्यालयीन कामकाजात अधिक सक्षम करण्यासाठी सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन येथे पार पडलेल्या या शिबिरात कर्मचारी, अधिकारी आणि असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
शिबिराच्या पहिल्या सत्रात एस. व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य आणि आधुनिक एआय तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले. दैनंदिन कामात तंत्रज्ञानाचा वापर करून ताणतणावापासून कसे दूर राहावे, याचे कसब त्यांनी कर्मचाऱ्यांना शिकवले. डॉ. अरुण कुहे यांनी संजीवनी क्रिया व आरोग्य या विषयावर प्रकाश टाकला.
दुसऱ्या सत्रात डॉ. गणेश धुमल यांनी कार्यालयीन कामकाजातील ताणतणाव आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. मृण्मयी भजक यांनी अमेरिका खाटी-मिठी हा विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापक कार्मिक अधिकारी प्रितमसिंह राजपूत, कार्मिक अधिकारी संतोष पळशीकर व रोहित सरगकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, शांतनू गोयल, गणेश देशमुख आणि मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.