मुंबई

गृहप्रकल्पांमुळे शेतकरी अडचणीत

CD

गृहप्रकल्पांमुळे शेतकरी अडचणीत
कर्जत-खालापूरमध्ये रस्ते प्रशासनाचा पाहणी दौरा
कर्जत, ता. २८ (बातमीदार) : कर्जत-खालापूर तालुक्यातील कल्पतरू आणि गोदरेज गृहप्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, रस्ते व पाण्याच्या प्रश्नांवरून संताप तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसी प्रशासनाने स्थळ पाहणी करत शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर २७ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांचे पथक प्रकल्पस्थळी दाखल झाले.
वर्णे येथील कल्पतरू आणि नावंढे येथील गोदरेज प्रकल्पांची पाहणी करताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. विजय बारंगळे, प्रीती जाधव, उदय चंदर, शैलेश जाधव, शीतल मंदाडे यांच्यासह राजेश लाड, गणेश भोईर आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. कल्पतरू प्रकल्पासाठी सुमारे २०० एकर जमीन वापरली गेली असून, अनेक शेतकऱ्यांना योग्य मोबदला व सुविधा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
प्रकल्प परिसरात पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना प्लॉट विक्री सुरू असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचेही समोर आले. नैसर्गिक नाले, पाण्याचे स्रोत आणि सार्वजनिक विहिरींवर परिणाम झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. वरणाई माता मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच सार्वजनिक विहिरीकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने महिलांना मोठी कसरत करावी लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, रघुनाथ देशमुख यांच्या शेतात चुकीचे बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. तसेच सुरेश शिर्के, पांडुरंग शिर्के आणि गजानन देशमुख यांच्या शेतांवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. दुसरीकडे, नावंढे परिसरातील गोदरेज प्रकल्पामुळेही शेतकरी प्रभावित झाले असून, प्रवीण हडप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

चौकट
अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर
प्रकल्पांमुळे शेतजमिनींवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा सर्वाधिक गंभीर ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीत परवानगीशिवाय बांधकाम झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. प्रशासनाने याची दखल घेत पुढील बैठकीत कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले असून, अतिक्रमण हटवण्याची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोट
आमच्या वडिलोपार्जित शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ते, पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे करणे, मंदिर व विहिरीकडे जाणारे रस्ते खुले करावेत तसेच अतिक्रमण हटवावे. पावसाळ्यापूर्वी या समस्या सोडवल्या नाहीत, तर शेतातच जलसमाधी घेणार आहे, असा इशारा प्रशासनाला देत आहोत.
- पांडुरंग शिर्के, शेतकरी, वर्णे

कोट
प्रत्यक्षात स्थळपाहणी केली आहे. पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या जमिनीत अनधिकृत काम आढळून आल्यास कारवाई करून तोडण्यात येईल. सर्व रस्ते खुले राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यासाठी अडचणी येणार नाहीत, अशा पद्धतीने संबंधितास आदेश देण्यात येतील.
-विजय बारंगळे, सहाय्यक संचालक विनिप्रा, मरारविम (मर्या.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT