बाळासाहेबांची विचारधारा फक्त राज ठाकरेंकडेच!
मनसे जिल्हा संपर्कप्रमुख योगेश परुळेकर यांचे प्रतिपादन
श्रीवर्धन, ता. २८ (वार्ताहर) ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा ठाकरी बाणा आणि त्यांच्यासारखी विचारधारा फक्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेच आहे, असे नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्कप्रमुख योगेश परुळेकर यांनी प्रतिपादन केले. मंगळवारी (ता. २८) शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते.
श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी खोटी आश्वासने देऊन विकासकामांचा आभास निर्माण केला आणि अनेक ठिकाणचा निधी लंपास केला, अशी टीका योगेश परुळेकर यांनी केली. श्रीवर्धन तालुक्यातील राजकारण हे पैशांभोवती फिरतंय याचा खेद व्यक्त करताना तालुक्यात संपर्क वाढवून मनसेचे खंबीर नेतृत्व तयार करणे व संघटना बळकट करणे हे एक महत्त्वाचे काम असेल, असा विश्वास योगेश परुळेकर आणि जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजन येरूणकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष मृदास तोंडलेकर, माजी श्रीवर्धन तालुकाध्यक्ष राजेश लोहार, प्रभारी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष संदेश कातळकर, ओमकार चोगले आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.