मुंबई

पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ विक्री

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : डोंबिवलीसह कल्याण परिसरातील डेअरी, स्वीटमार्ट, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि फास्ट फूड आस्थापनांमध्ये पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’चा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांना कोणतीही माहिती न देता या पदार्थाची पनीर म्हणून विक्री केली जात असल्याने अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेत कारवाईचा इशारा दिला आहे.
ठाणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने कल्याण-डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियमांची सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्यांनी पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक स्पष्ट करत, ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी मेनू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड तसेच विक्री बिलावर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच शक्यतो ब्रँडेड पनीरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख यांनी स्पष्ट केले की, चीज ॲनालॉग आरोग्यास अपायकारक नसला तरी त्यातील घटक व पोषणमूल्ये पनीरपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे ग्राहकांनी माहितीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. उत्पादक व पुरवठादारांनीही पॅकेजिंगवर अन्नपदार्थाचे खरे स्वरूप स्पष्ट नमूद करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी आर. व्ही. करडक, एम. डी. कोडग, एस. बी. आगावणे, एम. एम. शेंडगे तसेच असोसिएशनचे अजित शेट्टी, गिरीष शेट्टी, किशोर शेट्टी आदी उपस्थित होते.

कारवाईचा इशारा
दिवा, डोंबिवली, कल्याण तसेच ग्रामीण भागात पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर परवाना निलंबन किंवा रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT