मुंबई

उड्डाणपुलाखाली बेघरांची वाढती वस्ती

CD

उड्डाणपुलाखाली बेघरांची वाढती वस्ती
पालिका प्रशासनाला डोकेदुखी, सीवूड्समध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : सीवूड्स परिसरातील उड्डाणपुलाखाली बेघरांचा वाढता घरोबा ही गंभीर समस्या बनली असून, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतुकीचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
गेल्या काही वर्षांपासून सीवूड्स उड्डाणपुलाखाली पत्र्याच्या शेड, प्लॅस्टिक आच्छादन, जुने कपडे आणि घरगुती साहित्य वापरून अनेक कुटुंबांनी तात्पुरता निवारा उभारला आहे. रोजगाराच्या शोधात शहरात आलेल्या काही नागरिकांनी कायमस्वरूपी घराच्या अभावामुळे पुलाखालीच वास्तव्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात असली तरी काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी वस्ती उभी राहत असल्याचे चित्र आहे.
या वास्तव्यासोबत अनेक समस्या निर्माण होत आहेत. उघड्यावर चूल पेटवून स्वयंपाक केल्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, साचलेले पाणी यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा जवळ आल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, रात्रीच्या वेळी काही व्यक्ती दारू पिऊन भांडणे करतात, नशेखोरी करतात, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना असुरक्षित वाटत असल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी असामाजिक घटकांचा वावर वाढल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर ठरत आहे. पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमित झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे नियोजनबद्ध नवी मुंबईच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे.

सीवूड्स उड्डाणपुलाखाली निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यासाठी नेरुळ, बेलापूर आणि एनआरआय पोलिस ठाण्यातील अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, संयुक्त कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करण्यात येईल, - प्रशांत नेरकर, सहाय्यक आयुक्त

पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर
बेघर नागरिकांचा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून मानवी संवेदनांशी जोडलेला आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही या ठिकाणी राहत असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज अधोरेखित होत आहे. योग्य पर्यायी निवाऱ्याविना कारवाई केल्यास समस्या पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

संयुक्त कारवाईची गरज
महापालिका, पोलिस प्रशासन आणि संबंधित विभागांनी समन्वय साधून ठोस कारवाई करणे आवश्यक ठरत आहे. अतिक्रमण हटविण्यासोबतच सुरक्षा, स्वच्छता आणि पुनर्वसन या तिन्ही बाबींचा समतोल राखत दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चा

SCROLL FOR NEXT