मुंबई

भिवंडी शिक्षण विभागात सेवाशर्तींवरून वाद

CD

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : भिवंडी महापालिका शिक्षण विभागातील सेवाशर्तींच्या नियमांवरून वाद निर्माण झाला आहे. माध्यमिक शाळांसाठी तयार केलेले नियम प्राथमिक शिक्षण विभागालाही लागू केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतील सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पदाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सरकारकडून नियुक्ती न झाल्याने प्राथमिक विभागाचा प्रभारी कारभार सध्या माध्यमिक शाळेतील एका मुख्याध्यापकांकडे सोपवला आहे. शिक्षक संघटनांच्या मते, ही व्यवस्था नियमबाह्य असून त्यामुळे प्रशासकीय असमतोल निर्माण होत आहे. याप्रकरणी विरोधाचा सूर तीव्र होत असून, पीआरपी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे भिवंडी शहराध्यक्ष अब्दुल गनी खान यांनी हा मुद्दा महापालिका सभेत मांडण्याची मागणी केली आहे. सेवाशर्तींच्या नियमांमध्ये तातडीने सुधारणा करून प्राथमिक विभागासाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना उभी करावी, जेणेकरून शिक्षकांवर होणारा कथित अन्याय थांबवता येईल. तसेच, शिक्षण विभागासाठी सरकारमार्फत प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्राथमिक विभागात माध्यमिक स्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रशासकीय कारवाईची चौकशी करून ती रद्द करण्यात यावी, असेही खान यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक दुरुस्ती आणि चौकशीची मागणी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT