मुंबई

कर्जाच्या बहाण्याने १८ व्यक्तींना गंडा

CD

पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : भारतीय स्टेट बँकेकडून स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एकाने तब्बल १८ जणांची २० लाख ८१ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. संतोष तात्याबा नलावडे याच्या विरोधात पनवेल शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संतोष नलावडे हा करंजाडे येथे राहण्यास असून, तो त्याच भागात श्री स्वामी समर्थ ई-सेवा केंद्र चालवत होता. करंजाडे येथे राहणारा तक्रारदार शुभम पाटील (वय ३२) हा ऑक्टोबर २०२४ मध्ये आधार कार्डच्या कामासाठी संतोषच्या ई-सेवा केंद्रात गेला होता. त्या वेळी नलावडे याने शुभमला स्टेट बँकेकडून ८२ लाखांचे स्टँड अप इंडिया कर्ज मंजूर करून देण्याचे प्रलोभन दाखवले. शुभमला डम्पर खरेदी करून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्याने त्याने संतोषच्या माध्यमातून ४२ लाखांचे कर्ज घेण्याची तयारी दर्शविली. हे कर्ज मंजूर करण्यासाठी संतोषने कागदपत्रे, फाइल मेकिंग आणि प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली शुभमकडून वेळोवेळी साडेतीन लाख उकळले. मात्र, दीड वर्ष उलटूनही कर्ज न मिळाल्याने शुभम १५ एप्रिलला संतोषच्या केंद्रावर आपले पैसे परत मागण्यासाठी गेला होता. मात्र, तो केंद्र बंद करून पळून गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्यासारखेच फसवणूक झालेले अनेक नागरिक त्या ठिकाणी जमल्याचे शुभमच्या लक्षात आले. त्यानंतर फसवणूक झालेल्या १८ व्यक्तींनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देणग्या आणि व्यवहारांचा हिशोब द्या! PMOकडून मागणी, पण राम मंदिर ट्रस्टचा नकार

Latest Marathi News Live Update : दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध, फाशी हीच या आरोपीला योग्य शिक्षा : न्यायाधीश

Airplane Mode Myths : मोबाईल ऐरोप्लेन मोडवर ठेवला तरीही लोकेशन ट्रॅक होऊ शकते का? जाणून घ्या सिक्रेट फॅक्ट

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

मुंबई-पुण्यासह राज्यात पावसाची दमदार एंट्री! डेंग्यूपासून व्हायरल तापापर्यंत 'या' आजारांपासून राहा सावध

SCROLL FOR NEXT