राज्यात विजेची मागणी ३२,४९२ मेगावॉटवर
सूर्य तापल्याने एसी, पंखे, कुलर जोमात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : राज्यभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, उकाड्यामुळे नागरिकांचे हालबेहाल होत आहेत. उष्णतेवर मात करण्यासाठी घरातील एसी, पंखे, कुलर अखंडित सुरू असल्याने सोमवारी मुंबईसह राज्यात विजेची मागणी विक्रमी ३२ हजार ४९२ मेगावाॅटवर पोहोचली आहे.
महावितरणकडून मुंबईवगळता संपूर्ण राज्यभरातील सुमारे पावणेतीन कोटी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो, तर मुंबईत बेस्ट, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पाॅवरकडून सुमारे ४७ लाख ग्राहकांना वीज पुरवली जाते. राज्यात सोमवारी दुपारी ४ वाजता २८ हजार ३०३ मेगावाॅट, तर मुंबईत चार हजार १८९ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली. तापमानात झालेली वाढ आणि उकाड्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सध्या आतापर्यंतची सर्वाधिक मागणी नोंदलेली असतानाही राज्यात कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही.
----
पॉवर एक्स्चेंजमधील विजेचा दर साडेचार रुपयांवर
विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास, ती पूर्ण करण्यासाठी वीज वितरण कंपन्यांकडून पाॅवर एक्स्चेंमधून वीज खरेदी केली जाते. सध्या विजेची मागणी वाढल्याने एरवी एक ते दीड रुपया प्रतियुनिट दराने मिळणाऱ्या पाॅवर एक्स्चेंजमधील विजेसाठी सध्या साडेचार रुपये मोजावे लागत आहेत. वाढीव दराने घेतलेल्या या विजेचा भार थेट वीजग्राहकांवर पडणार आहे.
---
महावितरणकडे नोंदलेली मागणी (मेगावॉटमध्ये)
२ मे २०२५ - २५,२३०
२३ एप्रिल २०२५ - २६,०१२
१४ जानेवारी २०२६ - २७,१८७
१८ फेब्रुवारी २०२६ - २६,९३७
१४ मार्च २०२६ - २६,८१४
१८ एप्रिल २०२६ - २६,७४४
२७ एप्रिल २०२६ - २८,३०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.