मुंबई

थोडक्यात

CD

थोडक्यात

आरडीसीए अंडर-१४ क्रिकेट स्पर्धा सुरू
पोयनाड (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे चौदा वर्षांखालील मुलांची एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील विविध मैदानांवर सुरू झाली आहे. या स्पर्धेत ३२ अकॅडमी व क्लब संघ सहभागी झाले असून सामने साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळवले जाणार आहेत. पेण, महाड, पनवेल, कामोठे, गव्हाण व विचुंबे येथील मैदानांवर सामने होतील. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड रायगड संघासाठी होणार असून तो पुढे आंतरजिल्हा स्पर्धेत खेळेल. युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ देण्यासाठी आरडीसीए सातत्याने स्पर्धा व कॅम्प आयोजित करीत असल्याची माहिती अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी दिली.
---------------------------------
कुलर-एसीला वाढती मागणी
पोयनाड (बातमीदार) : उन्हाळा तीव्र होत तापमान ३५ अंशांवर गेल्याने पोयनाड परिसरात कुलर व एसीच्या मागणीत वाढ झाली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळावा, यासाठी नागरिक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकडे वळले आहेत. पोयनाड बाजारपेठेतील दुकानदारांकडे ग्राहकांची गर्दी वाढली असून दुपारच्या कडक उन्हामुळे खरेदीला वेग आला आहे. मुंबई-नवी मुंबईऐवजी स्थानिक बाजारपेठेतच एसी व कुलर घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या मागणीनुसार दुकानदार उपलब्धता वाढवत आहेत. दर काहीसे वाढले असले तरी उष्णतेच्या तडाख्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
--------------------------------------------
पेण आरटीओला दुभाजक भेट
पेण येथील आरटीओ कार्यालयाला डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दुभाजक भेट देत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे कार्यालय परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यक्रमावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल शेलार, संदेश मोरे, मंगेश चौधरी, अमर शेटे तसेच कार्यालय अधीक्षक मंगेश नाईक व प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिष्ठानकडून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.
------------------------------------
साईबाबा मंदिर वर्धापनदिन
उलवे (बातमीदार) : जावळे येथे शुक्रवारी (ता. १ मे) श्री साईबाबा मंदिराचा पहिला वर्धापनदिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. कीर्तन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उलवे परिसरात आयोजित रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
------------------------------------------
महापौरांचा नागरिकांशी संवाद
पनवेल (बातमीदार) ः महापौर नितीन पाटील यांनी वडाळे तलावावर मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिकांशी संवाद साधला. स्वच्छता, सुविधा व सुरक्षिततेबाबत समस्या जाणून घेत उपायांचे आश्वासन दिले. प्रशासन संवेदनशील असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
---------------------------------------------
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान
तुर्भे (बातमीदार) ः ऐरोली येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बदलत्या कुटुंब व्यवस्थेत त्यांच्या भूमिकेवर व्याख्यान आयोजित झाले. मुलांशी संवाद व नातवंडांशी मैत्री महत्त्वाची असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
----------------------------------------
नेरूळमध्ये नवीन पदपथ बांधणार
नेरूळ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर २८ मध्ये तेरणा रुग्णालय ते बालाजी मंदिर मार्गावर पदपथ व गटार नसल्याने पावसाचे पाणी साचते. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने नवीन गटार व पदपथ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे ३७ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्यामुळे रस्त्याची हानी व पाणी साचण्याची समस्या कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT