मुंबई

तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवा : डॉ. नीलम गोऱ्हे

CD

तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवा : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ता. २८ : शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महिला आघाडीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, की ‘आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’ आणि ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तळागाळातील गरजू महिलांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनांमुळे अनेक गरजू नागरिकांना थेट मदत मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय राहून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच, कार्य करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेत ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’अंतर्गत नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे निवारण करण्याची पद्धत सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’अंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, महिला संघटन अधिक बळकट करून विभागातील सामाजिक कार्यांना गती देण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात आली.


विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यशाळेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाबत रामहरी राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मोफत आरोग्य सेवा, कॅशलेस योजना तसेच महात्मा जोतिबा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली. तसेच धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि ‘एस.आय.आर.’ प्रक्रियेबाबत शेखर परदेशी यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT