मुंबई

चाकूने हल्ला

CD

धर्म विचारून चाकूने हल्ला
मिरा रोड प्रकरणाला गंभीर वळण

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा रोड येथील नयानगर भागात एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दोन जणांवर सोमवारी (ता. २७) चाकूने हल्ला करण्यात आला होता. या घटनेला आता गंभीर वळण लागले आहे. सुरक्षा रक्षकांना त्यांचा धर्म विचारून नंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामुळे गेल्यावर्षी काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न होता का, अशी जोरदार चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती.
आरोपी जैब जुबेर अन्सारीच्या घरात काही लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, मोबाईलसह काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच हे प्रकरण आता मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडे हस्तांतर करण्यात आले आहे. आरोपीचे दहशतवादी गटांशी संबंध आहे का, याची तपासणी केली जात आहे. त्याचे कुटुंब अमेरिकेत राहत असून आरोपीदेखील काही वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होता. त्यानंतर तो नयानगर भागात भाड्याच्या घरात राहायला आला होता.
दरम्यान, मंगळवारीदेखील पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यानंतर हे घर सील करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय ठेवण्यात येत असून स्थानिक पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या व स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी पोलिसांकडून तपासाबाबत माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT