‘प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा’
पालघर, ता. २८ (बातमीदार)ः बोईसर परिसरातील भूसंपादित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील नोंदी, मालकी हक्काचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून त्यांना योग्य मोबदला मिळवून द्यावा, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मंत्रालयातील बैठकीत त्यांनी याबाबतचे निर्देश दिले. वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनात पालघर तालुक्यातील १४ गावे बाधित होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मौजे हनुमाननगर, नेवाळे या दोन पुनर्वसित गावांचा समावेश आहे. यापूर्वी सूर्या प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १९८०च्या सुमारास पुनर्वसनासाठी जमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक वर्षे उलटूनही पर्यायी जमिनींचे सातबारे त्यांच्या नावावर झालेले नाहीत किंवा काही नोंदींमध्ये त्रुटी आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी वाढवण प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.