मुंबई

उल्हासनगरात राष्ट्रवादीला नवे नेतृत्व

CD

उल्हासनगर, ता. ४ (बातमीदार) : नेतृत्वाअभावी मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला उल्हासनगरात नवे नेतृत्व मिळाले. उद्योजिका व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सीमा आहुजा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सीमा आहुजा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. सीमा आहुजा या प्रकाश ऑटोचे मालक महेश आहुजा यांच्या पत्नी आहेत. या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या ज्योती शेळके, सायमा शेख, राष्ट्रीय जनसेवा संघटनेचे विनोद भारे, महेश आहुजा, नरेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यासह माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड, लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते. शिंदे यांनी आहुजा यांच्या नियुक्तीपत्रात, त्या संघटन बळकट करून पक्षविस्तारासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व घटकांना सोबत घेत पक्षाची ध्येय-धोरणे व अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT