मुंबई

असंघटित कामगारांना संघटित करणे हेच इंटकचे ध्येय

CD

असंघटित कामगारांना संघटित करणे हेच इंटकचे ध्येय
शिवडी, ता. ४ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे कामगारवर्गाचे खच्चीकरण होत असून, त्याविरोधात इंटक शर्थीने लढा देईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले, तर असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढणे हेच इंटकचे कायम ध्येय असल्याचे महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.
महाराष्ट्र इंटकच्या फोर्ट येथील प्रदेश कार्यालयात इंटकचा ७९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. तसेच ७९व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीपूर्ण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
इंटकची स्थापना ३ मे १९४७ रोजी झाली. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेने पुढे देशातील प्रमुख केंद्रीय कामगार संघटना म्हणून ओळख निर्माण केली. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, जगजीवन राम, गुलझारीलाल नंदा, हरिलाल शास्त्री, खंडूभाई देसाई आदी नेत्यांचेही योगदान लाभले.
राज्यात इंटकची पायाभरणी करण्यामध्ये कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी इंटकचे अध्यक्षपदही भूषविले होते. इंटकच्या स्थापनेमागे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जोडलेला असल्याने वर्धापनदिनाला विशेष महत्त्व असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या वेळी कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, जी. बी. गावडे, सचिव मुकेश तिगोटे आदींनी इंटकच्या वैभवशाली वाटचालीचा आढावा घेतला. तसेच संघटनेत ध्येयवादी आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
इचलकरंजीतील ज्येष्ठ इंटक नेते श्यामराव कुलकर्णी यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT