लाल मिरचीला अवकाळीचा फटका
आवक घटल्याने बाजारात भाव वाढले
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार)ः ग्रामीण भागात एप्रिलनंतर घरातील मसाला-हळद, कांदा-लसूण-खोबऱ्याच्या साठवणुकीची लगबग सुरू होते. सध्या महिलावर्ग मसाला, हळद बनवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यंदा अवकाळी पावसाने लाल मिरचीची आवक घटली असल्याने भाव वाढले आहेत.
मसाला करण्यासाठी लागणाऱ्या सुकलेल्या लाल मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. दोन-तीन वर्षा पूर्वी १२० रुपये किलो भावाने विकली जाणारी तिखट मिरची यंदा दुप्पट भावाने विकली जात आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मध्य प्रदेशमधून येणाऱ्या लाल मिरचीला पावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे मिरचीचे भाव गगनाला भिडले आहेत.
---------------------
मिरचीचे प्रकार किलोचे भाव
लावनगी - २३०-२६०
पांडी - ३०० - ३२०
कास्मिरी - ६००- ६५०
शंकेश्वरी - ३६० - ३८०
बेडकी - ४००- ४५०
रेशम पट्टा - ४५० ते ५००
----------------------------
महिलांची कसरत
ग्रामीण भागात वर्षाकाठी सरासरी ८ ते १२ किलो मसाला बनवला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात सुकलेली लाल मिरची खरेदी करतात सुकलेल्या लाल मिर्चीचा भाव वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.