मुंबई

ओ.एस.-२४ भूखंड बनला ‘धुराचाडेपो’

CD

कचराभूमीतून धुराचे लोट
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रकार
बोईसर, ता. ४ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावरील कचरा जाळण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
प्लॅस्टिक व इतर घातक कचरा जाळल्याने उठणाऱ्या दाट काळ्या धुरामुळे कामगार, प्रवासी, शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. सालवड ग्रामपंचायतीकडून येथे हा कचरा टाकला जात आहे, पण त्या कचऱ्याला कोणीतरी आग लावत असल्याने परिसर धुराच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या प्रदूषणाबरोबर विषारी धुराचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे.
--------------------
प्रशासनाचा कानाडोळा
- धुरामुळे श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव अशा तक्रारी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी भटकी जनावरे कचरा खात असल्याने त्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
- प्रखर उन्हात कचऱ्याची उष्णता, त्यातून उठणारा धूर यामुळे परिसरातील वातावरण असह्य झाले आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून हा प्रकार बंद करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : भाजपचा दिल्लीतील मुख्यालयात जल्लोष, PM मोदींसह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT