मुंबई

जनम बारियाची आयसीएसईमध्ये ९८% भरारी

CD

जनम बारियाची आयसीएसईमध्ये भरारी

विरार (बातमीदार) : विरार येथील जनम मनाली उपेश बारियाने इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयसीएसई) बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवत देदीप्यमान यश संपादन करत, दोन विषयात १०० पैकी १०० गुण पटकावले आहेत. याआधी दहावीच्या परीक्षेत त्याने प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्ता सिद्ध केली होती. विरारजवळील आगाशी गावातील जनम बारिया हा जुहू येथील जमनाबाई नरसी शाळेचा विद्यार्थी असून, शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उच्च दर्जाची कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे बारावीच्या परक्षेत जिओमेट्रिकल आणि मेकॅनिकल ड्रॉइंग या विषयांमध्ये त्याने १०० पैकी १०० गुण मिळवत आपली गुणवत्ता अधोरेखित केली. या विषयांमधील परिपूर्ण गुणांमुळे त्याच्या अभ्यासातील सखोलता आणि तांत्रिक समज स्पष्ट झाली आहे. जनम हा उत्तम फुटबॉलपट्टू असून इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असतानाही तो लहान वयातच कवितादेखिल करतो. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT