मुंबई

जेष्ठ नागरिक रममाण होणार बालपणीच्या जीवनात

CD

ज्येष्ठ नागरिक रमणार बालपणीच्या जीवनात
विरंगुळा केंद्रात सामाजिक आरोग्याला प्राधान्य

वसई, ता. ४ (बातमीदार) : जीवनातील ‘सेकंड इनिंग’मध्ये रममान झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी नेहमीच अनुभवाची शिदोरी बांधून असते. अशा या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या हक्काचे स्थान मिळावे म्हणून वसई-विरार महापालिकेने त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक स्तरावर वसई, नालासोपाला व विरार येथे प्रथमतः तीन विरंगुळा केंद्रे उभारण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून, त्यानंतर या विरंगुळा केंद्रात वाढ करण्यात येणार आहे.

मुंबई, ठाणे अशा महानगरातून अनेक नागरिक वसई-विरार येथे स्थायिक झालेत. तसेच या महापालिका क्षेत्रातील स्थानिक नागरिक हेदेखील निवृत्तीनंतर सकाळ व संध्याकाळच्या सत्रात आपल्या परिसरात आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्या आठवणींच्या शिदोरीतील गप्पागोष्टींचे किस्से सांगत मन रमवत असतात. अशात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र असावे यासाठी वसई-विरार पालिकेने कंबर कसली असून, त्यांनी यासंदर्भात पालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाज पत्रकात २५ लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार सध्या तरी प्राथमिक धर्तीवर तीन ठिकाणी विंरगुळा केंद्रे उभारण्याची तयारी पालिकेने केली आहे. या विरंगुळा केंद्रांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक हे आपले वाढदिवस साजरा करणे, सामाजिक उपक्रम राबवणे व इतर गोष्टी ज्या त्यांच्या ‘सेकंड इनिंग’ला साजेशा आहेत, ते करण्यावर भर देऊ शकतील. यातून त्यांच्या दैनंदिन जीवनात दररोज एक नवचैतिन्याचा दिवस येणार आहे.

तसेच या विरंगुळा केंद्रात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणारी वाचणाची आवड पाहता, एक छानसे वाचनालयही येथे असेल. तसेच हा प्रकल्प महापालिकेचा असला तरी या विरंगुळा केंद्रावरील हक्क हा ज्येष्ठ नागरिकांचाच असणार आहे.
-----------
२५ लाखांची तरतूद प्रस्तावित
वसई-विरार शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. त्यातून सोयीसुविधा असलेल्या विरंगुळा केंद्राची निर्मिती केली जाणार आहे.
--------------
वसई-विरार शहरात ज्येष्ठ नागरिकांना हक्काची जागा त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी महापालिकेने विरंगुळा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून त्यांना सामाजिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील.
- अजीव पाटील, महापौर
--------------
ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विरंगुळा केंद्र चांगले व्यासपीठ ठरेल. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. ज्यामुळे नागरिकांना एकत्र येत, त्यातून विचारांची देवाण-घेवाण करण्याची संधी प्राप्त होईल.
- सतीश अडसूळ, ज्येष्ठ नागरिक, वसई
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT