भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : शहरात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून पाच जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कमरूजमा मोहम्मद शब्बीर शेख (वय ३८) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलला मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास शेख हे काम आटोपून दुचाकीवरून न्यू आजादनगर येथील घरी जात होते. त्यावेळी निजामी हॉटेलसमोर पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. बोरिंगचे साहित्य चोरी केल्याच्या संशयावरून आरोपींनी शेख यांच्यावर अचानक हल्ला चढवत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचे दोन्ही हात-पाय फ्रॅक्चर झाले असून, डोके, पाठ आणि पोटावर गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ शेख यांना उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कबरूद्दीन सिद्दीकी, अफसार सिद्दीकी, इमरान अन्सारी, शहनवाज सिद्दीकी आणि आलम शेख यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.