

India A Cricket Team
Sakal
Tri Nation A Series Winner: तिलक वर्माच्या नेतृत्वातील भारतीय अ संघाने (India A) रविवारी (२१ जून) तिरंगी वनडे मालिकेचे विजेतेपद जिंकले आहे. डंबुलाला झालेल्या अंतिम सामन्यात भारत अ संघाने श्रीलंका अ संघाला ६६ धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे भारताने विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीसह (Vaibhav Sooryavanshi) यश ठाकूरने (Yash Thakur) मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला ४७.१ षटकात सर्वबाद ३११ धावाच करता आल्या आहेत. श्रीलंकेसाठी सदिरा समरविक्रमा आणि वानुजा सहान यांनी अर्धशतक करत झुंज दिली. पण श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचता आले नाही.