

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असून राज्यभरात पावसाची हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून सध्या पुण्यातही पाऊस कोसळत आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच आयएमडीने हवामानाबाबत नवा अंदाज वर्तवला आहे.