मुंबई

अग्निशमन दलाची केंद्रे आता सौर ऊर्जेवर उजळणार

CD

अग्निशमन दलाची केंद्रे आता सौरऊर्जेवर उजळणार
मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक पाऊल; पहिल्या टप्प्यात १५ कोटी खर्च करणार
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : महापालिका आपल्या पायाभूत सुविधांना पर्यावरणपूरक बनवण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून, मुंबई अग्निशमन दलाची विविध केंद्रे आणि भायखळा येथील महापालिका मुद्रणालय येथे ‘रूफटॉप सोलर पॉवर जनरेशन सिस्टम’ (सौरऊर्जा प्रकल्प) बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी सुमारे १५.९७ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागातर्फे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
​ ​या प्रकल्पांतर्गत मुंबईतील विविध अग्निशमन केंद्रे आणि महापालिका मुद्रणालयाच्या छतावर सौरऊर्जा संच बसवण्यात येणार आहेत. यामध्ये सौरऊर्जा प्रकल्पाचे डिझाइन, फॅब्रिकेशन, पुरवठा, स्थापना आणि चाचणी अशा कामांचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसाळा वगळून आठ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रियेतील कामांच्या नोंदीनुसार​ अंदाजित खर्च १५ कोटी ९७ लाख ६४,८९१ रुपये तर ​बयाणा रक्कम १५ कोटी ९७ लाख ६५० इतकी आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २१ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असून, ​प्री-बीड मीटिंग ६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात होणार आहे.

वीजबिलात बचत
​​या कामासाठी महापालिकेचे अ वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदार किंवा केंद्र/राज्य शासन आणि सार्वजनिक उपक्रमांमधील समकक्ष दर्जाचे कंत्राटदार अर्ज करू शकतात. जे कंत्राटदार पालिकेकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांना कंत्राट मिळाल्यास तीन महिन्यांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य असेल. ​या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीजबिलात बचत होणार असून, कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT