मुंबई

गटाराच्या धोकादायक झाकणांची अखेर दुरुस्ती

CD

गटाराच्या धोकादायक झाकणांची अखेर दुरुस्ती
मालाड, ता. ४ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी अंबोजवाडी परिसरात उघड्या गटारात दुचाकीसह पडून महिला जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. या गटाराची अखेर पालिकेने दुरुस्‍ती केली आहे.
नागरिकांनी पालिकेच्या निष्काळजीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या घटनेबाबत ‘सकाळ’च्या शनिवारच्या (ता. २) अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत येथील झाकणांची दुरुस्‍ती करण्यात आली.
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि धोकादायक ठरत असलेल्या गटारांच्या लोखंडी झाकणांची तातडीने दुरुस्ती करून घेतली. या दुरुस्तीमुळे परिसरातील दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Assembly election results 2026 Live Update : स्टालिन यांच्यानंतर ममता बॅनर्जीही पराभवाच्या उंबरठ्यावर, दुसरा मुख्यमंत्री पराभूत होणार?

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT