मुंबई

रुग्णांची धावपळ थांबणार

CD

रुग्णांची धावपळ थांबणार
उपनगरातील चार पालिका रुग्णालयांत लवकरच एमआरआय, सीटी स्कॅन सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई महापालिकेच्या चार उपनगरीय रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय मशीन लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. वांद्रे येथील के. बी. भाभा, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बोरिवलीतील भगवती व मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयात या मशीन उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत पालिकेच्या वतीने किंवा खासगी सहभाग तत्त्वावर एमआरआय तसेच सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. या मागणीनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथील पहिल्या मजल्यावरील ए विंगमधील १४८.६४ चौ. व १३९ चौ मीटर एवढ्या क्षेत्रफळाची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेत तिथे एमआरआय आणि सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रतिवर्ष सुमारे दोन लाख रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे, तर वांद्रे भाभा रुग्णालयाच्या तळमजल्यावरील १७६.७२ चौ. मी. आणि १६०.३४ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा. अनुक्रमे एम. आर. आय. आणि सी.टी. स्कॅन प्रति वर्ष ६,००,००० प्रति वर्ष यानुसार क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड या संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. बोरीवलीतील हरीलाल भगवत्ती रुग्णालयातील तळमजलावरील २७२.३२ चौ. मी. आणि २५९.६८ चौ. मी. एवढ्या क्षेत्रफळाची जागा, अनुक्रमे एम. आर. आय. आणि सी.टी. स्कॅन करता प्रति वर्ष ७,९५,००० प्रति वर्ष यानुसार पल्स हायटेक हेल्थ सर्विसेस प्रा. लि. या संस्थेला तर मुलुंड येथील म.तु.अगरवाल रुग्णालयाच्या तळमजल्यावरील १९१.८० चौ. मी. आणि १९२.९८ चौ. मी. एवढ्या क्षेत्रफळाची जागा, अनुक्रमे एमआरआय आणि सीटी स्कॅन सुविधेसाठी रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि. या संस्थेला प्रतिवर्ष ६,११,००० याप्रमाणे भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व संस्थांना प्रथम १० वर्षे आणि त्यानंतर १०-१० वर्षे अशा प्रकारे ३० वर्षांकरिता भाडेकरावर जागा दिली जाणार आहे. यामाध्यमातून या चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआरआय तसेच सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पालिका दरातच चाचणी
उपनगरीय रुग्णालयातील अनेक रुग्णांना या सुविधांसाठी अनेकदा कूपर किंवा थेट केईएम रुग्णालय गाठावे लागते. अनेकदा रुग्ण खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन या चाचण्या करून घेतात. पालिका रुग्णालयांच्या तुलनेत या चाचण्यांसाठी रुग्णांना दुपटीने पैसे मोजावे लागतात. मात्र, पालिकेने राबवलेल्या या धोरणाने रुग्णांना पालिका दरातच चाचणीची सुविधा उपलब्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT