मुंबई

गणेशपुरीत क्रिकेट स्पर्धेचा थरार

CD

वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब आणि युवा क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व. प्रकाश (आप्पा) पाटील चषक २०२६’ ही भव्य डे-नाईट ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा १५ ते २१ मे दरम्यान भिवाळी येथील भाऊराव पाटील मैदानावर रंगणार आहे. स्पर्धेत दोन मुख्य गटांचा समावेश असून, विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिके आणि चषक ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेतील सर्व सामने पाच षटकांचे खेळविण्यात येणार आहेत. फोर्टी प्लस लीगमधील खेळाडूंना विशेष टी-शर्ट देण्यात येणार असून काळी ट्रॅक पॅन्ट बंधनकारक असणार आहे. स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘यूट्यूब’वर असून घरबसल्या प्रेक्षकांना सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. २१ मे रोजी स्पर्धेचा महाअंतिम सामना आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी जितू पाटील, योगेश पाटील, भाई पाटील, मनोज जाधव यांच्यासह श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लबचे सदस्य परिश्रम घेत आहेत. परिसरातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुख्य गट पारितोषिके :
प्रथम – ५१ हजार रुपये व चषक
द्वितीय – २५ हजार रुपये व चषक
तृतीय – १५ हजार रुपये व चषक
चतुर्थ – १५ हजार रुपये व चषक

फोर्टी प्लस प्रीमियर लीग :
प्रथम – ३० हजार रुपये व चषक
द्वितीय – २० हजार रुपये व चषक
तृतीय – १० हजार रुपये व चषक
चतुर्थ – १० हजार रुपये व चषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

SCROLL FOR NEXT