अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : शेजारी राहणाऱ्या लहान मुलांच्या आणि महिलांच्या वादाचा राग मनात धरून तरुणाने एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना अंबरनाथमध्ये रविवारी (ता. ३) घडली आहे. या प्रकरणी हर्ष नरेश जोहर (वय १९) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ वर्षीय मुलाच्या बहिणीचा शेजारी राहणाऱ्या कविता गोहेरे यांच्या मुलीसोबत रविवारी दुपारी वाद झाला होता. या वादात मुलाच्या बहिणीने मुलीला चापट मारली होती. या किरकोळ कारणावरून दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये बाचाबाची आणि भांडण झाले होते. याच वादाचा राग मनात धरून हर्ष जोहर याने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुलगा घरात एकटा असताना त्याच्या घरात प्रवेश केला. त्याने मुलावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी हर्षविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.