स्वयंस्फूर्तीने ऑनलाइन स्वगणना करावी
वनमंत्री गणेश नाईक यांचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : गणेश नाईक यांनी नागरिकांना जनगणना २०२७ मध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक माहिती आवश्यक असल्याने प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ऑनलाइन स्वगणना करावी, असे त्यांनी सांगितले. १ मे महाराष्ट्र दिनापासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून, नाईक यांनी स्वतः घराची स्थिती, कुटुंबाची माहिती व उपलब्ध सुविधा याबाबत ३३ सोप्या प्रश्नांची उत्तरे भरून स्वगणना पूर्ण केली.
या उपक्रमावेळी महापौर सुजाता पाटील आणि शहर जनगणना अधिकारी उपआयुक्त संजय शिंदे उपस्थित होते. नागरिकांना १५ मेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरता येणार असून, त्यानंतर मिळणारा कोड प्रगणकांना देणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जूनदरम्यान अधिकारी घरी भेट देऊन माहिती पडताळणार आहेत. महापौर आणि आयुक्तांनीही नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.