मुंबई

पनवेलमध्ये अवघ्या १५ दिवसांत दोन अनोळखी महिलांची हत्या;

CD

पनवेलमध्ये १५ दिवसांत दोन महिलांची हत्या
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : पनवेल परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिंचवली-वाकडी सीमेवरील हत्येची घटना ताजी असतानाच, रविवारी (ता. ३) बंबावी पाडा येथे एका ३५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या १५ दिवसांत दोन महिलांची हत्या झाल्याने संपूर्ण पनवेल परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बंबावी पाडा येथे एका ३५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल आहे. या घटनेतील मृत महिला रेल्वे सबवेच्या बाजूला मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
तर, काही दिवसांपूर्वीच ११ एप्रिल रोजी चिंचवली आणि वाकडी गावाच्या सीमेजवळ राजमाती वन विभागाच्या जंगलात एका २० ते २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसताना, पनवेलमधील बंबावी पाडा येथे आणखी एका महिलेची हत्या झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एकाच दिवशी दोन हत्या
रविवारी घडलेल्या दुसऱ्या घटनेत अमित रॉय (३५) या बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अमित रॉय हा रविवारी कामावर गेला होता. मात्र, तो घरी परतलाच नाही. त्याचा मृतदेह सोमवारी (ता. ४) सकाळी उसर्ली येथील रेल्वेच्या पुलाच्या दोन पिलरच्या मध्यभागी आढळले. त्यांच्या डाव्या डोळ्यात कोणत्याही टोकदार हत्याराने भोसकल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे विशेष पथक
सध्या पनवेल शहर व तालुका पोलिस आणि गुन्हे शाखा या दोन्ही प्रकरणांचा कसून तपास करत आहेत. तिन्ही गुह्यांची पद्धत पाहता, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणेने पोलिसांचे विशेष पथक तयार केले आहेत. पनवेलच्या हद्दीत एकापाठोपाठ घडत असलेल्या हत्येच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी, विशेषत: महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT