मुंबई

पाण्यासाठी अर्धनग्न होऊन आंघोळ करू

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महापालिका क्षेत्रातील विविध परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अशातच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पौंडपाडा, पवनपाडा भागातही महिन्यात केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याने संतापलेल्या नागरिकांसह आम आदमी पक्षाने सोमवारी (ता. ४) पालिका मुख्यालयावर धडक दिली. या वेळी पाणीप्रश्न सोडवा अन्यथा अर्धनग्न होऊन अंघोळ करू, असा इशारा पालिका प्रशासनाला दिला.

यंदाच्या वर्षी तापमानात अपेक्षेप्रमाणे अधिक वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यातदेखील कमालीची घट झाली आहे. त्यात पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात लागू करण्यात येते. त्यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. अद्याप कपात लागू करण्यात आली नसली तरी विविध कारणांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशातच कळवा पूर्वेतील भास्कर नगर, पौंड पाडा आणि पवनपाडा परिसरात महिन्यातून केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करत, या भागातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

समस्या सोडविण्याचे आश्वासन
परिसरात तीन जलकुंभ असतानाही नियमित पाणी मिळत नसल्याने लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिक करदाते असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. विभागीय पाणीपुरवठा अधिकारी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पाडत नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी केला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत ती सोडविण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT