उल्हासनगर, ता. ४ (बातमीदार) : कारच्या धडकेने पाण्याचा एअर व्हॉल्व्ह तुटल्याची घटना आज मध्यरात्री (ता. ४) उल्हासनगरात घडली आहे. परिणामी त्याचे पडसाद शहरात कमी दाबाने पाणीपुरवठ्यावर उमटले आहे.
बारवी धरणातून येणारे पाणी प्रभाग क्रमांक १७ मध्ये एअर व्हॉल्व्हद्वारे या परिसरातील पाण्याच्या टाक्यात साठवले जाते. मात्र मध्यरात्री बेधुंद कारचालकामुळे एअर व्हॉल्व्ह तुटल्याने रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले. ही माहिती समजताच उपमहापौर अमर लुंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले. लुंड यांच्यासोबत स्थानिक नागरिक मदतीला धावले. त्यांनी एअर व्हॉल्व्हमधून निघणारे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी थांबवले. पण परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याची माहिती लुंड यांनी दिली.
विशेष म्हणजे उपमाहापौर अमर लुंड यांनी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून नागरिकांच्या मदतीने तुटलेल्या एअर वॉल मधून वाहणारे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.