मुंबई

संस्थाचालकांच्या वादाचा फटका शिक्षिकेला

CD

बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : पूर्वेतील आगरआळी परिसरातील हिंदी विद्यालयात संस्थाचालकांमधील अंतर्गत वादाचा फटका एका महिला शिक्षिकेला बसला आहे. सात ते आठ महिन्यांपासून त्यांचा पगार थांबवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. न्याय मिळावा या मागणीसाठी संबंधित शिक्षिकेने शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
देवयानी देसले यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये नियमानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करून शाळेत रुजू होत शिक्षणसेवा सुरू केली. शिक्षण मंडळाच्या उपसंचालक कार्यालयाकडून नियुक्तीबाबत पत्रही प्राप्त झाले होते. मात्र, सध्याचे मुख्याध्यापक राजेश यादव यांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत पगार रोखून धरल्याची तक्रार करण्यात आली आहे. देसले यांच्या म्हणण्यानुसार, आजी-माजी संस्थाचालकांमधील वादाचा थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेवर झाला आहे. त्या अनेक महिन्यांपासून विनापगार सेवा देत आहेत. कामगार दिनापासून देसले यांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, रविवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्याध्यापक राजेश यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते चार दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याचे समोर आले. त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची भूमिका समजू शकलेली नाही.

संस्था निबंधकांकडे तक्रार करण्याचा सल्ला
गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांनी सांगितले की, हे प्रकरण वरिष्ठ स्तरावर गेले असून संबंधित मुख्याध्यापकांना देसले यांचे पगारपत्रक सादर करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप पगारपत्रक सादर केले नसल्याने वेतन प्रलंबित आहे. संस्थाचालकांमधील वादामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली असून, आवश्यक असल्यास संस्था निबंधकांकडे तक्रार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा देत असताना माझा पगार थांबवणे ही अन्यायकारक बाब आहे. संस्थेतील अंतर्गत वादाचा फटका माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांना बसू नये. संबंधित प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून मला न्याय द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. अन्यथा माझे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
- देवयानी देसले, महिला शिक्षिका

बदलापूर : थकित पगार मिळवण्यासाठी शिक्षिकेने शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT