मुंबई

कैलास नगर परिसरात बिबट्याचा वावर!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या परिसराला लागून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणाहून वाट चुकून अनेकदा बिबटे व अन्य प्राणी लोक वस्त्यांमध्ये येतात. अशातच वागळे इस्टेट भागातील संजय गांधी उद्यानालगत असलेल्या कैलास नगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी मानपाडा येथील इडेन वूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्याने भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पोखरण रोड क्र. २ परिसरातील बेथनी हॉस्पिटलजवळील बांधकामाचे ठिकाणी आणि सनलाईट इमारत परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. जानेवारीमध्ये वागळे इस्टेटमधील वारली पाडा भागात बिबट्याने लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. त्यातच आता वागळे इस्टेट येथील कैलास नगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

'कॅटरिना' वाघिणीने केली दोन हरणांची शिकार; दृश्य कॅमेऱ्यात कैद, बोर व्याघ्र प्रकल्पातील थरार; पाहा VIDEO

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT