मुंबई

अलिबागमध्ये रंगणार ग्रामीण नाट्यमहोत्सव

CD

अलिबागमध्ये रंगणार ‘नाट्यप्रभा’
१८ ते ३१ मेदरम्यान ग्रामीण नाटकांची पर्वणी
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : पीएनपी कलाविकास मंडळाअंतर्गत ग्रामीण रंगभूमी आयोजित ‘नाट्यप्रभा’ हा ग्रामीण नाट्यमहोत्सव १८ ते ३१ मेदरम्यान पीएनपी नाट्यगृहात रंगणार आहे. ग्रामीण भागातील नाट्य चळवळीला नवसंजीवनी देणे आणि या कलावंतांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे, अशी माहिती पीएनपी नाट्यगृह उपाध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी दिली.
ग्रामीण नाटके ही आपल्या संस्कृतीची मुळं आहेत. गावागावात जपली गेलेली ही परंपरा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ते समाजाच्या भावना, संघर्ष आणि वास्तव मांडणारे एक प्रभावी माध्यम आहे. अनेकदा या नाटकांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. हाच विचार लक्षात घेऊन नाट्यप्रभा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना व्यावसायिक नाटकांप्रमाणे भव्य आणि दर्जेदार रंगमंच उपलब्ध करून दिला जात आहे. या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण कलाकारांना त्या रंगमंचावर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे अलिबागकरांनाही १८ ते ३१ मेदरम्यान विविध नाट्य कलाकृती अनुभवण्यास मिळणार आहेत. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात १८ ते ३१ मेदरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता या महोत्सवांतर्गत एक नाट्यकृती सादर होणार आहेत.

नाट्यप्रेमींसाठी मेजवानी
१८ मे रोजी ‘गजा आला रे’, १९ मे रोजी ‘स्वप्न सुखाचे पाहताना’, २० मे रोजी ‘वेड्या भावाची वेडी माया’, २१ मे रोजी ‘दीप तुझ्या वंशाचा’, २२ मे रोजी ‘अजून अंधार दाटून आहे’, २३ मे रोजी ‘करमरकर हाऊस’, २४ मे रोजी ‘माझा काय गुन्हा...!!’, २५ मे रोजी ‘विठ्ठल विठ्ठल’, २६ मे रोजी ‘विदूषक’, २७ मे रोजी ‘वेडा वृंदावन’, ३० मे रोजी ‘माझं काय चुकलं’, ३१ मे रोजी ‘वारी’ अशा विविध नाट्यकृती सादर होणार आहेत. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन पीएनपी नाट्यगृहाचे उपाध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT