मुंबई

अखेर पंधरा डब्यांची लोकल धावली

CD

जीवघेण्या प्रवासातून सुटका
१५ डब्यांची लोकल अखेर धावली, प्रवाशांना दिलासा
पालघर, ता. ४ ः पश्चिम उपनगरी मार्गावर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांची लोकल सुरू केली आहे. यामुळे वाढत्या गर्दीला आळा बसणार असून, दररोजचा जीवघेणा प्रवास तूर्तास तरी थांबणार असल्याचे समाधान प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्याच्या विभाजनानंतर जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. तसेच बोईसर, तारापूर एमआयडीसीत कामानिमित्त येणारे कामगार, स्थलांतरित झालेले नागरिक आणि इतर कामांसाठी येथे येणारे नागरिक यांची संख्या वाढली आहे. या शहरीकरणामुळे रेल्वेलगत असलेल्या पालघर, डहाणू, वसई तालुक्याची लोकसंख्या दुप्पट झाली आहे, पण त्या तुलनेत डहाणू लोकल सेवा अपुरी असल्याने प्रवाशांच्या तुलनेत सेवा तोकडी पडू लागली होती. त्यानुसार अप तसेच डाऊन मार्गावर आठ लोकल फेऱ्या होणार असल्याने गर्दीतून प्रवाशांची सुटका झाली आहे.
---------------------------
तांत्रिक बदलांवर भर
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी सेवेचा एप्रिल २०१३ मध्ये डहाणू रोडपर्यंत विस्तार झाला. मात्र, मर्यादित लोकल सेवेची संख्या पाहता प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करणे भाग पडत होते. डहाणू, वाणगाव, बोईसर, पालघर, सफाळे भागातून विरार, वसई, मुंबईकडे कामासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच अनुषंगाने पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून काही महिन्यांपासून विरार स्थानकात तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
--------------------------
गर्दीच्या नियंत्रणासाठी १५ डब्यांची लोकल चालवण्याचा रेल्वेचा विचार होता. त्यानुसार फलाटांची लांबी वाढवणे, इतर कामे प्रगतिपथावर होती. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधताना १५ डब्यांच्या लोकलचा शुभारंभ करण्यात आला. वेगवेगळ्या स्थानकावर रेल्वे प्रवासी रेल्वे संघटनांनी रेल्वेचे गार्ड आणि मोटरमन यांचे अभिनंदन करताना आनंद साजरा केला.
-------------------
जय्यत तयारी
- वैतरणा ते डहाणू रोड दरम्यानच्या स्थानकांमधील फलाटांची लांबी वाढवली
- विरार रेल्वे स्थानकात ३ अ नवीन फलाटाची निर्मिती
- सफाळे, उमरोळी येथील रेल्वे फलाटांची लांबी वाढवली
- उमरोळी, वाणगाव, डहाणू रोड येथे फलाट व्यवस्थेमध्ये बदल
-------------------------
उपनगरी सेवेचे वेळापत्रक
अप मार्ग :
७.१७ वा. डहाणू रोड - चर्चगेट ९.५६ वा.
१३.२० वा. डहाणू रोड - विरार १४.३५ वा.
१७.१० वा. डहाणू रोड - विरार १८.३५ वा.
२२.४५ वा. डहाणू रोड - विरार २३.५० वा.

डाऊन मार्ग :
५.३५ वा. विरार - डहाणू रोड ६.५० वा.
१०.३० वा. चर्चगेट - डहाणू रोड १२.४० वा.
१५.०० वा. विरार - डहाणू रोड १६.२० वा.
२०.३० वा. विरार - डहाणू रोड २१.५८. वा.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT