कोमसापचा वर्धापनदिन पालघरमध्ये उत्साहात
पालघर (बातमीदार) : कोमसाप, पालघर शाखेचा ३२ वा वर्धापनदिन सफाळे येथील देवभूमी सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी चिंचणी येथील पी. एल. श्रॉफ कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका संध्या शहापुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी २०२४-२५ या वर्षातील ‘सर्वोत्तम शाखा’ म्हणून मंत्री संजय केळकर यांच्या हस्ते केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत पालघर शाखेचा सन्मान करण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालघर शाखेच्या वर्धापनदिनी शाखेची स्थापना करून शाखेचे संवर्धन करणाऱ्या शाखेच्या आजपर्यंतच्या सर्व माजी अध्यक्षांना मानपत्र, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पालघर शाखेच्या ‘युवा शक्ती’च्या सभासद असलेल्या विद्यार्थिनींनी समुहगीत व कवितांचे सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुस्तकांची भेट देऊन युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.