कोळी मल्हार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मनोर (बातमीदार) : आदिवासी कोळी मल्हार समाजाचा सातवा मेळावा मनोर येथील शगुन ग्राउंड येथे उत्साहात पार पडला. समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती, भाषा आणि ओळख जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला कोळी मल्हार समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बदलत्या काळात आदिवासी समाजासमोर उभे राहणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि ओळखीसंबंधित प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. या मेळाव्यात समाजातील बंधू-भगिनी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे घेण्यात आली, ज्यामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षण, एकता, स्वावलंबन आणि सामाजिक संघटन यावर भर देण्यात आला.
आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील, अविनाश सुतार तसेच इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदिवासी समाज उन्नत कसा होईल, याबाबत माहिती दिली. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी युवकांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच शासकीय योजना, आरक्षणाचा योग्य लाभ, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक एकजूट यांचा योग्य वापर केल्यास समाज निश्चितच प्रगतीच्या मार्गावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.