मुंबई

जिल्ह्यात पावसाळपूर्व मशागतीची कामे सुरू

CD

जिल्ह्यात पावसाळपूर्व मशागतीची कामे सुरू
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने पहाटे व सायंकाळी शेतात लगबग सुरू झाली आहे. बांधबंदिस्ती करणे, राब जाळणे, शेतातील पाला-पाचोळा गोळा करणे, गवत काढणे आदी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून, त्यासोबत फळपिके व भाजीपाला लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. सुवर्णा, जया, कर्जत, रत्ना या भाताच्या जातींची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. जिल्ह्यातील सुमारे ९७ टक्के शेतकरी पावसावर अवलंबून असून, अंदाजे ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानवाढ झाल्याने शेतकऱ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पहाटे आणि सायंकाळीच शेतात काम करण्यास प्राधान्य देत आहेत.
दरम्यान, काही भागांत अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आधीच पूर्ण केली आहेत, तर काहींनी पेरणीसाठी लागणाऱ्या भात बियाण्यांची तयारी सुरू केली आहे. पुढील १५ दिवसांत बहुतांश कामे पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT