मुंबई

‘शहर विकास’ची दमदार सुरुवात

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महापालिकेच्या शहर विकास विभागाने नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातच उत्पन्नवाढीच्या जोरावर केली आहे. एप्रिल या नवीन आर्थिक वर्षातील पहिल्याच महिन्यात विभागाने ३२ कोटी ७८ लाखांचे उत्पन्न जमा करत वार्षिक लक्ष्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. यंदाच्या २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी या विभागाला ६६३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार केला असता, मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि शहर विकास विभाग यांवरच मुख्यतः आर्थिक गाडा अवलंबून आहे. याशिवाय अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम आणि जाहिरात विभागातूनही काही प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, नवीन उत्पन्न स्रोतांचा अभाव ही महापालिकेसमोरील मोठी समस्या ठरत आहे. शहर विकास विभागाला विकास शुल्क, अतिरिक्त व वाढीव भूनिर्देशांक (एफएसआय) आणि विविध मंजुरी प्रक्रियेतील शुल्कांमधून उत्पन्न मिळते. मात्र, सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमुळे या उत्पन्नावर काही प्रमाणात मर्यादा येत असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच यंदाच्या वर्षी एप्रिल या पहिल्याच महिन्यात विभागाने ३२ कोटी ७८ लाखांचे उत्पन्न जमा करत वार्षिक लक्ष्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे.

मागील आर्थिक वर्षातही शहर विकास विभागाने अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती. ६५० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ६६२ कोटी ९१ लाख रुपये जमा करून तब्बल १२ कोटींहून अधिक अतिरिक्त महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला होता. विविध शुल्कांवरील सवलतींचा परिणाम असूनही विभागाने सातत्याने चांगली कामगिरी राखली आहे.

थकबाकी वसुलीचे आव्हान
मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतील थकबाकीही चिंतेचा विषय ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर थकबाकी शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या अपेक्षित उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे वसुली यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेने विविध स्रोतांतून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

अन्य पर्याय शोधण्याची गरज
मालमत्ता करातून एक हजार २०० कोटी, शहर विकास विभागातून ६६३ कोटी, पाणीपुरवठ्यातून २५० कोटी, अग्निशमन विभागातून १३० कोटी, जाहिरात शुल्कातून सुमारे ४० कोटी, अनुदानातून ४२८ कोटी, तसेच गुंतवणूक आणि बाँडच्या माध्यमातूनही उत्पन्न अपेक्षित आहे. शहर विकास विभागाची सुरुवातीची कामगिरी आशादायक असली तरी भविष्यात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधणे आणि थकबाकी वसुलीवर भर देणे महापालिकेसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

चालू वर्षातील उत्पन्नाचा पर्याय
उत्पन्नाचा प्रकार लक्ष्य (कोटींमध्ये)
मालमत्ता कर १,२००
शहर विकास विभाग ६६३
अनुदान ४२८
पाणीपुरवठा विभाग २५०
अग्निशमन विभाग १३०
जाहिरात शुल्क ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT