मुंबई

ट्रान्सफॉर्मर जळल्याने काशीद येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लॉजिंग मालकांची नाराजी

CD

महावितरणच्या अजब कारभारामुळे काशीदची बत्ती गुल
पर्यटकांनी पाठ फिरवल्याने लॉजमालकांचे मोठे नुकसान
मुरुड, ता. ४ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या काशीद येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने सलग दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात आणि उष्णतेच्या लाटेत वीज गायब झाल्याने पर्यटकांनी काशीद सोडून घराचा रस्ता धरला. याचा मोठा फटका स्थानिक लॉजमालकांना बसला आहे.
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. शाळांना सुट्ट्या लागल्या असून, आठवड्याच्या जोडून सुट्ट्या आल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. परंतु ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तब्बल दोन दिवस बत्ती गुल झाली. परिणामी पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. उन्हाच्या वाढत्या तडख्याने पर्यटकांनी अखेर काशीद सोडून चक्क घर गाठल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे ऐन मोसमात काशीदमधील असंख्य लॉजमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत शाखा अभियंता शेख यांना विचारणा केली असता, ट्रान्सफॉर्मर लवकरच बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी (ता. ३) संध्याकाळच्या सुमारास विद्युत पुरवठा नियमित झाल्याचे सांगितले.

२०० लॉजमालकांना फटका
काशीद येथील अपेक्षित विजेचा वापर लक्षात घेता वारंवार ट्रान्सफॉर्मर जळण्याची घटना घडत आहे. याबाबतीत २०० हून अधिक लॉजमालकांनी आर्थिक फटका बसल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असताना वीज गायब झाल्याने ग्राहक त्रस्त झाले होते. मुरूड तालुक्याचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असल्याने सर्वांना घामाच्या धारा लागल्या होत्या. ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे यांनी सांगितले, की महावितरणकडे पर्यायी प्रभावी योजना नाही. वीज साहित्याचा अपुरा पुरवठा असून, एखादा सुट्टा पार्ट हा त्यांना गोरेगाव येथून आणावा लागणे हे समर्थनीय नसल्याचे म्हटले. वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत असल्याने येथील पर्यटकसंख्या घटत आहे. पर्यटक रूम सोडून जात असल्याने येथील लॉजिंगवाल्यांचे झालेले नुकसान महावितरणने भरून द्यावे, अशी मागणी सरपंच संतोष राणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unclaimed Bank Deposits : जुन्या बंद पडलेल्या बँक खात्यात पैसे विसरलात? 'या' सोप्या पद्धतीने पुन्हा मिळेल रक्कम; RBI ची नवी डिजिटल सुविधा

Sankashti Chaturthi 2026: सर्वार्थ सिद्धी योगामुळे वृषभसह 'या' 4 राशींवर गणरायाची विशेष कृपा; अचानक होऊ शकतो धनलाभ!

Washim News : पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; कोठडीतील मृत्यूप्रकरणी नऊ जण दोषी

Cabinet Reshuffle: दिल्लीत मोठ्या हालचालींची चर्चा! राजनाथ सिंहांनी पद सोडल्यास पुढे काय? अमित शाह यांच्याबाबतही मोठे संकेत?

Premium|Swiss Investment Philosophy : स्विस गुंतवणूक तत्त्वांचा मंत्र; श्रीमंतीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन

SCROLL FOR NEXT