मुंबई

अलिबागमध्ये १४ मे रोजी शून्य सावली दिवस

CD

अलिबागमध्ये १४ मे रोजी शून्य सावली दिवस
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) ः सावली आपली साथ कधीच सोडत नाही, असे म्हटले जाते. पण वर्षातून दोन दिवस असे असतात, की ही सावली आपल्याला अनुभवता येत नाही. या दिवसाला शून्य सावली दिवस असे म्हटले जाते. सूर्य अगदी ९० अंशाच्या कोनात डोक्यावर येणार असल्याने गुरुवार (ता. ७)पासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला दुपारी १२ वाजता सावली बेपत्ता होण्याचा अनुभव घेता येणार आहे. अलिबागमध्ये हा दिवस १४ मे रोजी असणार असून, याचा अनुभव घेण्याचे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.
शून्य सावलीची संकल्पना कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. त्यामुळे या भागातूनच वर्षातून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामुळे तेथे नेहमी तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष सरळ ९० अंश कोनात असता तर विषुववृत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. हा क्षण अनुभवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. त्यासाठी साहित्य म्हणजे दोन, तीन इंच व्यासाचा आणि एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लॅस्टिक पाइप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वतः उन्हात सरळ उभे राहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल. हा एक भौगोलिक, गणितीय आणि वैज्ञानिक प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा प्रयोग अवश्य पाहावा, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT