मुरूड पोलिस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावले
दोघांवर गुन्हा दाखल
मुरुड, ता. ४ (बातमीदार) ः पोलिस ठाण्यातच गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना मुरूड येथे घडली आहे. शुक्रवारी (ता. १) रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलिस ठाण्यातील दप्तरी कक्षात पोलिस अधिकारी एका गुन्ह्यासंदर्भात फिर्यादीची चौकशी करत होते. याच वेळी त्या गुन्ह्यातील आरोपी संतोष हिरवे यांची दोन मुले आणि एक विधी संघर्षित बालक अचानक पोलिस ठाण्यात दाखल झाले. या वेळी पोलिस कर्मचारी हरी मेंगाळ यांनी सिद्धेश यांच्याकडे नाव व पत्ता विचारला. याचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी संतापून मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांनी ठाणे अंमलदारांशी हुज्जत घालत थेट अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी तुम्हाला बघून घेतो, अशी उघड धमकी देत त्यांनी सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांच्या वर्तनामुळे पोलिस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गदमले हे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.