फ्लेमिंगो अधिवास विस्ताराला प्रतीक्षा
तुर्भे, ता. ४ (बातमीदार ) : नवी मुंबईतील जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धन क्षेत्राच्या विस्ताराचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून, तो १२ हेक्टरवरून जवळपास ३६ हेक्टरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रस्तावाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
मॅंग्रोव्ह (कांदळवन) सेल आणि वन विभाग यांनी ऑक्टोबर २०२५मध्ये सुधारित प्रस्ताव सादर केला होता. याबाबतची माहिती नॅटकनेक्ट फाउंडेशनला माहिती अधिकारातून मिळाली आहे. दरम्यान, सिडकोकडून याच १२ हेक्टर तलाव क्षेत्राचे रिअल इस्टेट प्रकल्पात रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तलावाला ‘प्लॉट’ म्हणून गणून प्रति हेक्टर सुमारे ३०० कोटी दराने तब्बल तीन हजार ६०० कोटींचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
सिडको ही संस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येते. त्याचवेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी फ्लेमिंगो अधिवास वाचवण्यासाठी सातत्याने भूमिका मांडली असून, या विषयावर राजकीय स्तरावरही मतभेद दिसून येत आहेत. १७ एप्रिल २०२५ला झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, अंतिम शासन निर्णय लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले, की या प्रस्तावाच्या प्रगतीवर माहिती अधिकाराद्वारे लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी राज्य सरकारने त्वरित अधिसूचना जारी करून या प्रदेशाला कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.