पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला वेग
पेण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका सज्ज ः दयानंद गावंड
पेण, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्रासह कोकणात येत्या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असताना नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईला सुरुवात केली आहे. या नालेसफाईमधून हजारों टन प्लॅस्टिक कचरा बाहेर काढण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गटारांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच पडून अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे येणाऱ्या पावसात गटारे तुडुंब भरून पाणी रस्त्यावर येऊ नये याकरिता शासनाच्या माझी वसुंधरा स्वच्छ अभियानांतर्गत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील नालेसफाईला वेग आला आहे. येत्या दोन-चार दिवसांपासून आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील अनेक ठिकाणच्या गटारांमधून प्लास्टिक पिशव्यांसह सुका कचरा, ओला कचरा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आला आहे. तसेच नालेसफाई करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती या पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईच्या कामाला लागल्या असून, पेण शहरातील नालेसफाईच्या माध्यमातूनसुद्धा हजारो टन कचरा बाहेर काढण्यात आला. या कचऱ्याची विल्हेवाट पालिकेने बांधण्यात आलेल्या आंबेगाव येथील कचरा डेपोमध्ये केली असून, घनकचरा प्रक्रियेच्या माध्यमातून खतनिर्मिती करण्यात येत आहे.
पेण शहराच्या नगरपालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वीची खबरदारी घेत येत्या दोन-चार दिवसांपासून आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी शहरातील गटारे, नाले आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी कामाला लागले आहेत. शहराच्या मुख्य गटारांपासून ते इतर छोट्या मोठ्या गटारांमधील सर्व कचरा बाहेर काढण्यात येत आहे. आत्तापर्यंत हजारो टन कचरा काढण्यात येऊन त्याची विल्हेवाटसुद्धा लावण्यात आली आहे.
- दयानंद गावंड, आरोग्य अधिकारी, पेण नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.