मुंबई

कळंबोलीत सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त

CD

कळंबोलीत सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त
पनवेल (वार्ताहर) : कळंबोली पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कळंबोलीतील दत्त अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनमधील एका घरावर छापा मारून एक लाख १२ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि गुटखा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या वेळी गुटख्याचा साठा करून ठेवणारा आरोपी पळून गेला असून, कळंबोली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
कळंबोलीतील दत्त अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनमधील बिल्डिंग नंबर १६ मधील रूम नंबर ४ मध्ये गुटख्याचा साठा लपून ठेवण्यात आल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने रविवारी मध्यरात्री १२.३५च्या सुमारास छापा टाकला. मात्र छापा टाकण्यापूर्वीच गुटख्याचा साठा करून ठेवणारा आरोपी गोलू राजपूत याने पलायन केले.
त्यानंतर पोलिसांनी त्या घराची झडती घेऊन एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या राज कोल्हापुरी गुटख्याच्या १० गोणी तसेच चार हजार ५०० रुपये किमतीची तुलसी सुगंधी तंबाखूची २० पाकिटे असा एकूण एक लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गोलू राजपूत याच्याविरोधात अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६मधील कलम २६(२) (प), २६(२) (पा), २६(२) (म), ५९ (पप) तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३च्या कलम १२३, २२३, २६४, २६९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT