म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
मुंबई, ता. ४ : मुंबई शहर आणि उपनगरांत म्हाडाच्या जागेवर ठिकठिकाणी ५८ होर्डिंग असून, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाने संबंधित होर्डिंगधारकांना दिले आहेत. त्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या असून, त्यांनी आठवडाभरात स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल म्हाडाला सादर करावा लागणार आहे अन्यथा या होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे.
म्हाडाच्या जागेवर होर्डिंग उभारताना संबंधितांनी म्हाडा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक असतानाही त्यांनी केवळ संबंधित गृहनिर्माण संस्था आणि महापालिकेची परवानगी घेत होर्डिंग उभारली आहे. वर्षभरापूर्वी अशी ६० अनधिकृत होर्डिंग म्हाडाच्या जागेवर होती. त्यापैकी दोनवर म्हाडाने कारवाई केली. त्यानंतर म्हाडाने होर्डिंग धोरण आणले. दरम्यान, पावसाळ्यात होर्डिंग कोसळून अपघात घडू नये, म्हणून म्हाडाने आपल्या जागेवरील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत नोटीस दिली आहे. त्यानुसार मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल ऑडिटरकडून ऑडिट करून त्याचा अहवाल म्हाडाला सादर करावा लागणार आहे. तसेच कमकुवत होर्डिंगची दुरुस्तीही करण्याबाबत बजावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.