प्रेमसंबंधाच्या वादातून उल्हासनगरात चाकूहल्ला
चार अल्पवयीनांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : प्रेमसंबंधाच्या वादातून उल्हासनगरमध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला आहे. दोन दिवसांपूर्वी कॅम्प ५ परिसरातील नेताजी चौकात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ५ येथील नेताजी चौकात प्रेमसंबंधाच्या वादातून दोन गट आमनेसामने आले. वैयक्तिक कारणावरून सुरू झालेला वाद चिघळत गेल्याने दोन्ही गटांनी एकमेकांना तेथे बोलावले. सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळात गणेश वाघे या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी पंकज प्रजापतीसह एकूण पाच आरोपींना अटक केली असून, त्यातील चार जण अल्पवयीन आहेत. अल्पवयीनांना सुधारगृहात पाठविण्यात आले असून, मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.